अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा नराधम पकडला !
प्रतिनिधी —
एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास अकोले पोलिसांनी पकडले आहे.

आकाश राजू उघडे (वय ३० वर्ष, हल्ली राहणार विरगाव, तालुका अकोले, मूळ राहणार शेळके वस्ती, नांदुरी तुम्हाला तालुका संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन मुलीच्या आईने यासंदर्भात फिर्याद दिली आहे की, मुलीला लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेऊन आरोपीने मुली सोबत शारीरिक संबंध ठेवले व त्यापासून तिला दिवस गेले. ती गर्भवती आहे.

‘तू जर तुझ्या आईकडे गेलीस तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी सुद्धा या आरोपीने दिली. मुलगी अल्पवयीन असताना देखील तिला लग्नाचे आमीष दाखवून घरातून पळवून नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला म्हणून पोलिसांनी सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे.

अकोले पोलीस ठाण्यात आरोपी आकाश राजू उघडे यांच्याविरुद्ध गुन्हा नंबर 392 / 2023 भारतीय दंड विधान कलम 376 (2)(1)(N) 376(3) 366(अ) 506 सह पॉस्को 4,5 (1) (2) उल्लंघन 6,10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत.

