तब्बल २३ वर्षांनतर रंगले स्नेहसंमेलन !

तळेगाव दिघे विद्यालय ; अन्.. पुन्हा भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग !

प्रतिनिधी —

महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विद्यालयात सन २००० व २००१ वर्षात बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थी – विद्यार्थींनींचे स्नेहसंमेलन तब्बल २३ वर्षांनतर जुन्या आठवणींना उजाळा देत चांगलेच रंगले. यानिमित्ताने शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

तळेगाव दिघे विद्यालयात सन २००० व २००१ वर्षात बारावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या ५० विद्यार्थी – विद्यार्थिनींनी स्नेहसंमेलनात सहभाग घेतला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी तत्कालीन  सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षक व शिपाई यांना तसेच विद्यालयातील विद्यमान पदाधिकारी व शिक्षकांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान व गौरव केला. आयोजित स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एच. आर. दिघे होते. प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय कुळधरण, शंकर मुन्तोंडे, मोहन शेळके, उपमुख्याध्यापक संजय दिघे, तुकाराम सोळसे, भाऊसाहेब दिघे सहित मान्यवर उपस्थित होते.

तब्बल २३ वर्षांनतर माजी जी विद्यार्थी – विद्यार्थींनींचा पुन्हा वर्ग भरला आणि शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा मिळाला. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शरद भागवत, नितीन दिघे, गोविंद कांदळकर,दत्तात्रय बैरागी, अण्णासाहेब दिघे, रोहिदास सानप, भगवान सांगळे, संभाजी सानप, पोपट दिघे, दत्तात्रय कांदळकर, रंजना कांडेकर, सुरेखा क्षीरसागर, मनीषा ढवळे, जया दिघे या माजी विद्यार्थी – विद्यार्थींननींनी शाळेबद्दलच्या जुन्या आठवणी व भावना यावेळी व्यक्त केल्या. त्यानंतर स्नेहभोजन व सोबत आलेल्या लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन पूजन करण्यात आले. प्रसंगी प्राचार्य एच. आर. दिघे, दत्तात्रय कुळधरण, शंकर मुन्तोंडे, मोहन शेळके यांची भाषणे झाली. प्रास्ताविक विश्वास दिघे यांनी केले. स्वागत शरद भागवत यांनी केले. सूत्रसंचालन नितीन दिघे यांनी केले. उत्साही वातावरणात माजी विद्यार्थी – विद्यार्थींनींचे स्नेहसंमेलन पार पडले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!