आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून रस्त्यांसाठी ३२ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर

मालदाड- चिंचोली गुरव रस्त्यासाठी १४ कोटी ७५ लाख रुपये मंजूर

प्रतिनिधी —

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांकरता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३२ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती यशोधन प्रसिद्ध कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला आहे. या सततच्या विकास कामातून विस्ताराने मोठा असलेला संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे. प्रत्येक गावात पायाभूत सुविधा, रस्ते, सिमेंट बंधारे ,शाळा, दवाखाने यांसह विविध इमारती उभ्या राहिल्या आहेत .

याचबरोबर  पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून संगमनेर मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी नव्याने ३२ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. या अंतर्गत तालुक्यातील उत्तर भागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा आशा पीर बाबा- चिंचोली गुरव -नान्नज दुमाला- सोनोशी- बिरेवाडी- मालदाड या २० किलोमीटर गाव रस्त्यासाठी १४ कोटी ४५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे .

तर संगमनेर नगरपालिका हद्द तिरंगा चौक घुलेवाडी ते मालदाड या ६ किलोमीटर गाव रस्त्यासाठी ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६० ते गुंजाळवाडी- राजापूर -निमगाव भोजापूर- चिखनी वरपे वस्ती या ११ किलोमीटर रस्त्यासाठी ९ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे .

रणखांबवाडी- दरेवाडी- कवठे मलकापूर या ६ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने देवकौठे, चिंचोली गुरव, नान्नज दुमाला, सोनोशी, बिरेवाडी, मालदाड, घुलेवाडी, गुंजाळवाडी ,राजापूर, निमगाव, चिकनी, कवठे मलकापूर, दरेवाडी रणखांब या गावांमधील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!