कोळसा खाणींच्या स्फोटामुळे इमारत आली धोक्यात..

बाबा आमटेंच्या आनंद निकेतनसाठी खासगी संस्थेचा शोध

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी उभारलेल्या वरोरा येथील आनंद निकेतन कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. जीर्ण झालेल्या महाविद्यालयाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे १०० ते १२५ कोटींची गरज आहे.

महाविद्यालयाचा कारभार चालवणाऱ्या महारोगी सेवा समितीने आर्थिकदृष्ट्या सक्षम खासगी संस्था शोधण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविले आहे. संबंधित संस्थेकडून महाविद्यालयाची पुनर्बांधणी करून त्याचा कारभार सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे.

१९६४ मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयात सुमारे १,००० विद्यार्थी शिक्षण घेत असून, १०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. इमारतीची संरचनात्मक स्थिती धोकादायक असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. जवळच्या कोळसा खाणींमधील स्फोटांमुळे इमारतीला सातत्याने हादरे बसत असल्याने पुनर्बांधणीची गरज अधिक तीव्र झाली असल्याचे बोलले जात आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!