प्रजासत्ताक दिनी अकोलेत तालुकास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धा !

अजिंक्य कला व क्रीडा संवर्धन मंडळाचा उपक्रम 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अकोले —

अजिंक्य कला व क्रीडा संवर्धन मंडळाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, अकोले तालुका स्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे, पुरुष आणि स्त्री गटासाठी आयोजन केले असून, स्पर्धा बाजार तळ अकोले येथून सकाळी नऊ वाजता, अकोल्याचे लोकप्रिय आमदार किरण लहामटे यांचे शुभहस्ते सुरु होणार आहे.

              या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाने, स्पर्धा सुरु होणेच्या अर्धा तास आधी,आपली नोंदणी फी रु 51/-भरून, तसेच शपथ पत्र भरून,आपली नोंदणी करून घ्यावी. तरी अकोले तालुक्यातील लांब पल्ल्याच्या धावपटुनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन अजिंक्यचे अध्यक्ष ऍड. के. डी. धुमाळ आणि कार्याध्यक्ष व्ही. एस. दैवज्ञ यांनी केले आहे.

          या उपक्रमाचे प्रमुख प्रा. योगेश उगले सर आणि नितीन बाणाईत यांचेसह अजिंक्यचे अरुण रुपवते,शामसुंदर मुंदडा, डॉ. कुलकर्णी, सतीश मालवणकर, हेमंत दराडे(प्रसिद्धी प्रमुख ), प्रा. रंजना कदम, भाग्यवंत सर, डॉ. उमा कुलकर्णी, किरणजी कर्पे, राजेंद्र राठोड, दत्ता वडजे, दिलीप क्षीरसागर, हेमंत चव्हाण हे स्पर्धा यशस्वी करणेसाठी प्रयत्नशील आहेत.

         पुरुष विभागासाठी अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 1 हजार रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली असून, स्त्री विभागासाठी अनुक्रमे रु. 3 हजार, 2 हजार,1 हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत. पुरुष गटासाठी शर्यत अंतर सुमारे 18 कि.मी. असून, स्त्री गटासाठी ते सुमारे 10कि. मी. इतके असेल. स्पर्धा तालुकास्तरीय आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!