संगमनेर अमली पदार्थ ड्रग्स प्रकरणी कठोर कारवाई करण्याबाबत पोलिसांना निवेदन 

 राहुल गांधी समर्थक संघाने उपस्थित केले अनेक प्रश्न 

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर शहरात अमली पदार्थ विक्री प्रकरणी पोलिसांनी छापा टाकून आदित्य किशोर गुप्ता या तरुणाला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपी आणि या प्रकरणाशी सत्ताधारी राजकीय पक्षाचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट आरोप करण्यात येत असल्याने या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने तपास करणे गरजेचे आहे. शहरात अमली पदार्थ विक्रीचे प्रकार किंवा तस्करीचे प्रकार हे हप्तेखोरीतून होत असल्याचा आरोप देखील झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी समर्थ संघाच्या वतीने आज पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की,

संपूर्ण देशभरात ड्रग्स व त्याच्या मुळे बिघडलेली तरुण पिढी याच्या खूप बातम्या आत्तापर्यंत आपण ऐकत आलो परंतु आपल्या तत्परते मुळे संगमनेर मधील हे रॅकेट उघडकीस आणल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन.

तसेच आम्ही राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र(RGSS) यांच्यावतीने सविनय नम्रतापूर्वक विनंती की, उपरोक्त विषया संदर्भात खालील मुद्द्यावर सखोल चौकशी करून ह्या देश विघातक कृतीचे समूळ उच्चाटण करावे.

सध्या चालू असलेल्या तपासात खालील बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे का?

-आरोपी सह आत्तापर्यंत किती लोकांना अटक करण्यात आली आहे?

-आरोपींकडून नेमकी काय माहिती मिळाली?

-ड्रग्सचे स्रोत कोणते?

-आरोपी व्यक्तीच्या इतर गुन्हेगारी मागील फिर्यादी आहेत का?

-या ड्रग्सचा पुरवठा इतर व्यक्तींपर्यंत आहे का?

-इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सामग्री कोठून मिळाली?

-आरोपी व्यक्तीची PC किती दिवस आहे

-ड्रग्सच्या नमुन्यांची शासकीय रासायनिक संशोधनाकडे पाठवणी करण्यात आली आहे का?

-आरोपी व्यक्तीच्या मोबाइल फोनच्या कॉल डिटेल्स, बँक व्यवहार इत्यादींची तपासणी करण्यात आली आहे का?

-या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या इतर संशयित व्यक्तींच्या शोधात तपास चालू आहे का? ?

आम्ही अशी आशा बाळगतो की या प्रकरनाचा सर्व तपास व कारवाई कायद्यानुसार पार पाडण्यात येईल व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील. या प्रकरणातील पुढील प्रगतीबाबत आम्ही वेळच्यावेळी आपणास भेटत राहु. कल्याण जोर्वेकर,राम अरगडे, मोहसीन शेख, शंतनू भालेकर, प्रकाश कडलग, सतीश खताळ, अमोल शेलकर, अरुण गावित्रे, रवींद्र हासे, अनिल राऊत, सोमनाथ हासे, अक्षय मोहिते, प्रणव नवले, गणेश जगताप, राहुल वर्पे, किशोर खताळ, सुभाष कोकणे, बाळासाहेब जाधव मोहसीन शेख आधी सदस्य उपस्थित होते अशी माहिती राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने देण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!