संगमनेरातील बेघरांना हक्काचं घर देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठवपुरावा!

उपविभागीय कार्यालयात बैठक 

संगमनेर प्रतिनिधी : 

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेरच्या कष्टकरी वर्गाला हक्काचं घर देण्यासाठी प्रशासकीय कामांना वेग आला आहे. आज आमदार तांबे यांनी संगमनेरातील बे घरांना हक्काचं घर देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत कामांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, गटविकास अधिकारी सिनारे, नगर परिषद मुख्याधिकारी धनश्री पवार तसेच महाराष्ट्र कामगार संघटनेचे संगमनेरचे अध्यक्ष सचिन साळुंखे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

यावेळी पंतप्रधान आवास योजना, बांधकाम कामगार योजना आणि राज्य सरकारच्या विविध गृह योजनांमधून प्रत्येक पात्र महिलेला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात त्या सर्वांना पुढील दोन वर्षांत संगमनेरमध्ये घर मिळवून देऊ. गुंजाळवाडी, घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरातील सरकारी जमिनींचा सर्वेक्षण सुरू करण्यात आला आहे. या जमिनींवर सोसायटीच्या माध्यमातून घरकुल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक महिलेला सोसायटीची सभासदता मिळणार असून नियमानुसार लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करण्यात येईल. यांसह सर्व प्रलंबित कामांची माहिती घेतली.

शहरात प्लॉट उरले नाहीत पण आजूबाजूच्या गावांमध्ये सरकारी जमिनी आहेत. त्या जमिनी कलेक्टर साहेबांशी चर्चा करून गृहयोजनेसाठी मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे तसेच तीन एकर जागेवर बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात महिलांसाठी सुरक्षित निवास, मुलांसाठी खेळाचे गार्डन व अंगणवाडी आणि स्वच्छतेच्या आधुनिक सुविधा असतील. आमदार सत्यजीत तांबे

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!