मतदानाच्या दिवशी वाहनांची होणार काटेकोरपणे तपासणी
प्रतिनिधी —
निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त भरारी पथकांनी मतदानाच्या दिवशी अधिक सतर्क राहत वाहनांची काटेकोरपणे तपासणी करावी. असा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक ममता सिंग यांनी आज येथे दिल्या.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी नियुक्त भरारी पथकांच्या कामांची ममता सिंग यांनी आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन भेट देत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी भरारी पथकांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी एसएसटी (सॅटस्टिक सर्व्हिलन्स टीम) च्या कामांचाही पाहणी करत आढावा घेतला. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे व अधिकारी उपस्थित होते.
