विरोधकांनी साम-दाम-दंड-भेद अशी सर्व अस्त्रे वापरुनही कर्जतकरांनी त्यांना थारा दिला नाही —
कर्जत-जामखेड हा मतदारसंघ ‘रोल मॉडेल’ होणार —
आमदार रोहित पवार
प्रतिनिधी —
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करून प्रचंड मोठे यश मिळवल्यानंतर आमदार रोहित दादा पवार यांनी यानिमित्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भविष्यात कर्जतचा विकास आणि कर्जत-जामखेड मतदार संघाचा विकास या संदर्भाने मते मांडले आहेत.

कर्जतचं ग्रामदैवत सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या आशिर्वादाने आणि कर्जतकर मतदारांनी मोठ्या विश्वासाने भरभरुन दिलेल्या मतदानामुळं कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे १२ तर काँग्रेसचे ३ असे तब्बल १५ उमेदवार विजयी झाले आणि नगरपंचायतीवर राष्ट्रवादी-काँग्रेसचा झेंडा फडकला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या १२ जागांपैकी तब्बल ९ जागांवर महिला भगिनींनी बाजी मारली, हा दुग्धशर्करा योग आहे. या विराट विजयाबद्दल सर्वप्रथम मी कर्जतकर मतदार बंधू आणि भगिनी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. विरोधकांनी साम-दाम-दंड-भेद अशी सर्व अस्त्रे वापरुन नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुजान कर्जतकरांनी त्यांना थारा दिला नाही. असे आमदार पवार यांनी म्हटले आहे.
सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन करून पवार यांनी नगरसेवकाना शहराच्या विकासासाठी काम करण्यास शुभेच्छा दिल्या.

हा विजय जसा जनतेचा आहे, तसाच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचा आहे. त्यांनी अनेक दिवस अविश्रांत मेहनत घेऊन खऱ्या अर्थाने विकासाचा विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं. तसंच आदरणीय अजितदादा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसंच पालकमंत्री हसन मुश्रीफ या सर्वांचं या निवडणुकीत वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होतं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माझे मित्र व काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनीही या निवडणूक प्रचारासाठी आवर्जुन वेळ दिला. या सर्वांचं योगदान या विजयात आहे.
ही निवडणूक कर्जत शहराच्या विकासाला दिशा देणारी होती आणि कर्जतकरांनी याचा सखोल विचार करुनच योग्य उमेदवारांचीच निवड केल्याने पुढील काळात शहराचा विकासरथ वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही. निवडून आलेले सर्व सहकारी हे यापुढील काळात कोणत्याही गटा-तटाचं राजकारण न करता आणि सर्वांना सोबत घेऊन केवळ कर्जत शहराच्या विकासाचा ध्यास घेऊनच काम करतील, असा मला विश्वास आहे.

शहरात अनेक प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न तडीस लावण्यासाठी पुढील काळात राज्य सरकारच्या मदतीने प्रयत्न केला जाईल. मी यापूर्वीही सांगितल्याप्रमाणे कर्जत-जामखेड हा मतदारसंघ आपल्याला ‘रोल मॉडेल’ मतदारसंघ म्हणून बनवायचा असल्याने त्या अनुषंगानेच कर्जत शहराचाही विकास केला जाईल. त्यासाठी सर्व नवनिर्वाचित सदस्य हे प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, असा विश्वास आहे.
सर्वांचे मनापासून खूप खूप आभार! हा विजय मी कर्जतकरांनी टाकलेल्या विश्वासाला समर्पित करतो असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
