चंद्रकांत पाटलांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा !

प्रतिनिधी —

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हा समन्वयकांनी केली आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच पार पडली. या बैठकीला चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांनी चंद्रकांत पाटील यांना अनेक प्रश्न केले. मात्र, त्यांनी त्याची उत्तरे देता आली नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हाचे समन्वयक कमलेश बाबासाहेब नवले म्हणाले.

चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही नवले यांनी यावेळी केला आहे. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हाच्या वतीने १ मे रोजी भेंडा (नेवासा) बसस्थानका समोर चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेवर जोडे मारो आंदोलन करण्यात येईल.

असे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले असल्याचे नवले यांनी सांगीतले

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!