दूध संकलन केंद्र : 

वजन काटे आणि मिल्कोमीटर यांचे शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी करण्याचे आदेश   

राज्य सरकारचा निर्णय 

प्रतिनिधी —

यापुढे दूध संकलन केंद्रांवर प्रमाणित केलेले मिल्कोमीटर वापरावे लागतील व वजन काटे आणि मिल्कोमीटर यांचे शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी केली जाईल. अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सदर निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी असे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

दूध संकलन केंद्रांवर फॅट व एस.एन.एफ. मोजताना मिल्कोमीटर यंत्राचे चुकीचे सेटिंग करून शेतकऱ्यांची लूट केली जाते. वजन करतानाही शेतकऱ्यांना कमी वजन दाखवून लुटले जाते. किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने या पार्श्वभूमीवर दूध संकलन केंद्रावरील मिल्कोमीटर व वजन काटे हे सरकारी यंत्रणेच्या मार्फत तपासले पाहिजेत व यासाठी स्वतंत्र निरीक्षकाची नियुक्ती केली पाहिजे अशी मागणी सातत्याने लावून धरली होती.

नाशिक ते मुंबई निघालेल्या लॉंग मार्चमध्ये सुद्धा ही मागणी घेण्यात आलेली होती. लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेऊन यापुढे सर्व संकलन केंद्रावरील वजन काटे व मिल्कोमीटर शासकीय यंत्रणेमार्फत तपासले जातील हे निश्चित करण्यात आले होते.

वजन काटे वैधता प्रमाणीकरण विभाग व अन्न व पुरवठा विभाग या दोन शासकीय विभागांना याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.

अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या निर्णयाचे स्वागत केले असल्याची माहिती डॉ. अजित नवले केंद्रीय सहसचिव अखिल भारतीय किसान सभा यांनी दिली आहे.  संग्रहित छायाचित्र

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!