भाजपच्या बंडखोर उमेदवार मेधा दिपक भगत पक्षातून निष्कासित !

संगमनेर दि.२६ प्रतिनिधी

नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने मेधा दिपक भगत यांना पक्षातून निष्कासित केले आहे.

 

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी केलेल्या कारवाईचे पत्र मेधा भगत यांना पाठवले आहे. नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुवर्णा संदीप खताळ यांची उमेदवारी जाहीर केली असतानाही पक्षाच्या विरोधात जावून अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याबद्दलची कृती ही पक्ष अनुशासन भंग करणारी असल्याने पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे नितीन दिनकर यांनी कळवले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!