कानावर बिल्ला नसेल तर एक जूनपासून जनावरांची खरेदी-विक्री बंद !

प्रतिनिधी —

जनावरांचे ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) असल्याशिवाय १ जूननंतर कोणत्याही जनावराची खरेदी-विक्री करता येणार नाही. ३१ मेपर्यंत जिल्ह्यातील १०० टक्के पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून जनावरांचे ईअर टॅगिंग करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशनअंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत. ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे ईअर टॅगिंग रेकॉर्ड करणार आहे. परिणामी, जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यता उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचा तपशील यासारखी माहिती शासनाकडे राहणार आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांचे ईअर टॅगिंग करण्याची मोहिम सुरू आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ‘कानावर बिल्ले’ असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नाहीत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!