स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) संगमनेरचे मटका अड्डे सापडेनात !
मागील महिन्याच्या कारवाईनंतर झाली सेटलमेंट
वादग्रस्त एलसीबीचे कारनामे पुन्हा चर्चेत !!
प्रतिनिधी —
दररोज सुमारे 15 लाख रुपयांची उलाढाल असणाऱ्या आणि नगर जिल्ह्यात एक नंबर वर असणाऱ्या अवैध धंद्यांपैकी संगमनेर मधील मटका अड्डे सुरू असून मागच्या महिन्यात कारवाई केल्यानंतर आता सुमारे 65 ठिकाणी सुरू असलेल्या मटका पेढ्या टपऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि पथकाला सापडत नसून मटका किंग मंडळींची सेटलमेंट झाल्यानंतर संगमनेर उपविभागातील अवैध धंधांवरील कारवाई बंद करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक देखील याकडे सोयीने दुर्लक्ष करीत आहेत.
मागील महिन्यात गाजावाजा करीत संगमनेर शहर आणि तालुक्यात मटका अड्ड्यांना टार्गेट करून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी)ने संगमनेरात मोठा धमाकूळ घातला होता. शहर पोलिसांनी सुद्धा या कारवाई सहभाग घेत फक्त मटका अड्डे आणि मटका किंग टार्गेट केले होते. विविध पथकांच्या देवाण-घेवांनी वरून आणि हप्त्यांमध्ये वाढलेल्या मागण्यांवरून मटका किंग आणि संबंधित पथकाने मध्ये बेबनाव झाला असल्याची चर्चा त्यावेळी होती. पोलीस अधीक्षक, एलसीबी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण संगमनेर उपविभाग, विविध पथकांच्या भूमिकेबाबत त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा केली जात होती. मात्र त्यानंतर अचानक या कारवाया थांबल्या आणि शहरातील आणि संगमनेरातील व उपविभागातील अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत.
वादग्रस्त स्थानिक गुन्हे शाखा LCB
नगर पोलिसांची सर्वात जास्त चर्चेत असलेले ही शाखा नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. मात्र राकेश ओला (पोलीस अधीक्षक अहमदनगर) यांच्या कारकिर्दीत या शाखेविषयी अनेक तक्रारी वाढल्या. विविध आरोप या शाखेमधील अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर करण्यात आले. या शाखेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य नेमणुका, त्यांनी केलेल्या कारवाया नेहमी चर्चेत राहिल्या. नुकताच अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी थेट एलसीबीच्या विविध कारनाम्यांच्या विरोधात आणि कर्मचाऱ्यांची नावे घेत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून उपोषणाचा इशारा इशारा दिला आहे. एवढा सगळा गदारोळ होऊनही पोलीस अधीक्षकांनी कुठलीही न केलेली कारवाई आणि बाळगलेले मौन हेही तेवढेच धक्कादायक आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा मोठी की पोलीस अधीक्षकांचे अधिकार मोठे ? याबाबत आता नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.