बालविवाह… बलात्कारासह पोक्सो अंतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल

गुपचूप बालविवाह उरकला, मुलगी गर्भवतीही झाली… परंतु बाळंतपणाच्या वेळी उघड झाला गुन्हा..

प्रतिनिधी —

लोणी येथील एका रुग्णालयात बाळंतपणासाठी गेलेल्या विवाहितेचे वय कमी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर सदर मुलीच्या जबाबावरून घारगाव पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील रहिवासी असणाऱ्या मुलीच्या पतीसह सासू-सासर्‍यांवर आणि पिडित मुलीच्या आई-वडिलांवर बलात्कार, बालविवाह प्रतिबंध आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा बालविवाह लावणाऱ्या भटजीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती समजली आहे.

सुमारे दीड वर्षांपूर्वी पठार भागातील एका गावातील कुटुंबाने आपल्याच नात्यातील मुलगी सुन करून आणली. भावाची मुलगी बहिणीने सून म्हणून घरात आणल्यानंतर ती काही दिवसांनी गर्भवती राहिली. तीन ते चार दिवसांपूर्वी तिला लोणी येथे रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल केले असता कागदपत्र आणि इतर बाबींवरून सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे आणि तिचे लग्न करण्यात आले असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी पोलिसांना ही घटना कळवली. दरम्यान गर्भवती मुलीला मुलगी देखील झाली.

घारगाव पोलिसांनी सदर मुलीचा जबाब घेतला. आत्याच्या मुलाशी विवाह केला असून घराच्या दारासमोरच मंडप टाकून हा विवाह करण्यात आला असल्याचे तिने सांगितले. परंतु सदर मुलीचे वय कमी असल्याने त्या मुलीचा नवरा, सासू आणि सासऱ्यांवर आणि सदर मुलीच्या आई-वडिलांवर घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!